March 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

अमली पदार्थांविरोधात सोमेश्वर फाउंडेशनची व्यापक जनजागृती मोहीम, माजी नगरसेवक सनी निम्हण यांची माहिती

पाषाण :

विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी, आयटी आणि उद्योग नगरी अशी ओळख असणारे पुणे शहर ड्रगच्या विळख्यात अडकले असल्याचे भीतीदायक वातावरण गेल्या काही दिवसात निर्माण झाले आहे. त्यामुळे शहराची प्रतिमा देशपातळीवर मलीन होत असून, उद्योग धंद्याच्या विकासाला खीळ बसणार आहे

 

या सर्व बाबींचा विचार करून तरुण पिढीला ड्रग्स आणि अमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने दीर्घकालीन, व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी कळविली आहे.

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्या 26 जून रोजी सकाळी 9.00 वाजता संभाजी पार्क जंगली महाराज रस्ता येथे करण्यात येणार आहे.

शहरातील प्रथितयश व्यंगचित्रकार ‘पुणेकरांनो, एकत्र येऊन अमली पदार्थांच्या विरोधात लढू या’ असा संदेश आपल्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देणार आहेत. कार्टूनिस्ट कम्बाईन या संस्थेचे त्यासाठी सहकार्य लाभले आहे.

चारुहास पंडित, बैजनाथ दुलंगे, घनश्याम देशमुख, धनराज गरड, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, योगेंद्र भगत, शरयू फरकांडे, लहू काळे, राम मांडुरके, गौतम दिवार, चैतन्य गोवंडे हे व्यंगचित्रकार सहभागी होणार आहेत.