May 16, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील किरण सुयोग सोसायटीमधील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील : समीर चांदेरे

बालेवाडी :

बालेवाडी येथील किरण सुयोग सोसायटी येथे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या उपस्थितीमध्ये सोसायटी मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक संपन्न झाली.

 

या सोसायटीचा पाणी प्रश्न गंभीर आहे.”गेल्या ३-४ वर्षात बालेवाडी परिसरातील पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या आहे. सोसायट्यांना दररोज टँकर बोलवावे लागत असल्याने यामुळे रहिवाश्यांना जास्तीचा मेंटेनन्स भरावा लागत आहे”,असे यावेळी सोसायटीतील महिला भगिनींनी सांगितले. तसेच या सोसायटीतील नागरिकांना रस्त्याच्या बाबत देखील काही अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले.

किरण सुयोग सोसायटीतील नागरिकांसोबत झालेल्या मीटिंगमध्ये या सर्व समस्या जाणून घेत त्या चांदेरे साहेबांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचा शब्द उपस्थित नागरिकांना दिला : समीर चांदेरे (अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

 

या बैठकीसाठी हर्षल तापकीर,अमर रणवरे यांसह सोसायटीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.