July 17, 2024

Samrajya Ladha

जागतिक ऑलम्पिक दिनानिमित्त मुकेश प्रतिष्ठान व सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने अनाथ व दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग..

पुणे :

जागतिक ऑलम्पिक दिनानिमित्त मुकेश प्रतिष्ठान व सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने अनाथ व दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलीकांत पेठकर यांच्या जीवनावर आधारित ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते.

याविशेष स्क्रीनिंगसाठी पॅरालिम्पिक खेळाडू मुरलीकांत पेठकर हे स्वत: उपस्थित होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्याच आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या स्क्रीनिंगला सहकुटुंब उपस्थित राहण्याचा व या विशेष प्रसंगी पेठकर यांना भेटण्याचा भावनिक योग जुळून आला. ही मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुकेश प्रतिष्ठानचे महेंद्रजी पवार यांचे माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी आभार व्यक्त केले.

या विशेष स्क्रीनिंगच्या माध्यमातून प्रेरित होऊन दिव्यांग व अनाथ मुले प्रेरणा घेऊन नक्कीच आपल्या आयुष्यात नक्कीच नवी उंची गाठतील, असा विश्वास आहे. आपण मुकेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून करता असलेल्या सामाजिक कार्यला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा : सनी विनायक निम्हण( माजी नगरसेवक)