July 17, 2024

Samrajya Ladha

महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ ‘वामा वुमन्स क्लब’ चा शुभारंभ सोहळा संपन्न..

बाणेर :

महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून पूनम विशाल विधाते यांच्या वतीने ‘वामा वुमन्स क्लब’ चा शुभारंभ सोहळा आज मा. नगरसेविका सुषमाताई निम्हण, मा. नगरसेविका रोहिणी चिमटे, ज्येष्ठ प्राध्यापक सुनीता पाडाळे,समाजसेविका ज्योती बालवडकर, समाजसेविका नीता जावळकर तसेच पत्रकार शितल बर्गे यांनी दीप प्रज्वलन करत ‘वामा वूमेन्स क्लबचे’ अनावरण करुन संपन्न झाला.

खरंतर ‘वामा वुमन्स क्लब’ हा ग्रुप स्त्री शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी, तिच्यातील स्व: ची ओळख निर्माण करून देण्यासाठी सुरू केलेली छोटीशी सुरुवात पण, आज या कार्यक्रमाला तब्बल ७०० महिलांनी उपस्थित राहत हा केवळ एक महिलांचा ग्रुप नसून एक ‘महिलांची चळवळ’ आहे असे दाखवून दिले. जमलेल्या माझ्या सर्व माता-भगिनींना माझ्या स्त्री सक्षमीकरणाच्या या प्रयत्नाला दिलेल्या प्रोत्साहनासाठी सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानते : पूनम विशाल विधाते(संस्थापक अध्यक्ष वामा वुमन्स क्लब)

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, कान, नाक, घसा तज्ञ व बाणेर, बालेवाडी डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. कविता चौधरी, बँक ऑफ बडोदा च्या वरिष्ठ व्यवस्थापिका वृषाली दरडे यांनी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन केले. जमलेल्या सर्व महिलांना वामा वुमन्स क्लब ची आठवण म्हणून कॉफी मगचे वाटप करण्यात आले.

सर्व महिलांनी कार्यक्रमाच्या शेवटी गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरत मनसोक्त आनंद साजरा केला. तेजस्विनी भाले तसेच शोभा श्रीकांत यांनी देखील कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन करत, वत्सला शर्मा यांनी कार्यक्रमाची सांगता केली. ‘वामा वुमन्स क्लब’ माध्यमातुन महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जाणार आहेत.