July 17, 2024

Samrajya Ladha

बाणेर-बालोवाडीकरांची वाहतुक कोंडीतुन मुक्तता व्हावी म्हणून “अमोल बालवडकर फाऊॅंडेशनच्या” वतीने पुन्हा एकदा ट्रॅफिक वॅार्डन नियुक्ती…

बालेवाडी :

बाणेर-बालेवाडी परिसरात होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी “अमोल बालवडकर फाऊॅंडेशनच्या” वतीने पुन्हा एकदा बाणेर बालेवाडी परिसरातील विविध चौकांमध्ये गेल्या एक हप्त्यापासुन ट्रॅफिक वॅार्डनची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

गेल्या वर्षी देखिल या परिसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी”अमोल बालवडकर फाऊॅंडेशनच्या” वतीने “ट्रॅफिकमुक्त बाणेर-बालेवाडी” अभियान यशस्वीपणे राबविले होते. याच धरतीवर आताही नागरीकांच्या मागणीनुसार या परिसरातील विविध चौकातील वाहतुक कोंडी लवकरच या ट्रॅफिक वॅार्डनच्या माध्यमातुन सोडविण्यात येईल…

सध्यस्थितीला बालेवाडी ममता चौक व गणेश मंदिर चौक बालेवाडी फाटा याठिकाणी ट्रॅफिक वॅार्डनची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लवकरच पुढील टप्प्यात परिसरातील ट्रॅफिक जॅम होणार्या प्रत्येक चौकांमध्ये अधिकच्या ट्रॅफिक वॅार्डनची नियुक्ती करण्यात येणार आहे.