July 8, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य कुस्ती आखाड्यात पै.शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी )व कांचन सानंद ठरले चांदीच्या गदेचे मानकरी..

बालेवाडी :

बालेवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव हा हनुमान जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो. यात्रे निमित्त समस्त बालेवाडी ग्रामस्थ व धर्मवीर आखाडा यांच्याकडून खास कुस्ती शौकिनांसाठी निकाली कुस्त्यांच्याजंगी आखाड्याचे नियोजन (ता. ३० एप्रिल) रोजी बालेवाडी येथील दसरा चौकातील संजय फार्म येथे करण्यात आले.यावेळी महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांनी येथे आपली उपस्थिती लावली. यामध्ये बहुतेक कुस्त्या या चुरशीच्या झाल्या.

 

विजय पैलवानांना बालेवाडी ग्रामस्थांकडून एक हजार रुपयांपासून पाच लाखांपर्यंत रोख रक्कम, त्याचबरोबर चांदीच्या गदा बक्षीस रूपात देण्यात आल्या.

बालेवाडी येथे श्री काळभैरवनाथ उत्सवा निमित्त भव्य अशा कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी ) विरुद्ध मिलाद सोरमी (इरान )यांची कुस्ती ही चुरशीची ठरली. या कुस्ती शिवराज राक्षे हे विजयी झाले. यांना स्व. पै .मगन बालवडकर यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि सनी बालवडकर यांच्याकडून चांदीची गदा व पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर महिलांच्या कुस्ती मध्ये कांचन सानप विरुद्ध सुकन्या मिठारे कुस्ती झाली. या कुस्ती मध्ये कांचन सानप यांनी विजय मिळवत मानाची चांदीची गदा व ५० हजार रुपये बक्षीस पटकावले. हे बक्षीस वैशाली यांच्याकडून त्यांना देण्यात आले .

या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक नामांकित मल्लांनी कुस्तीसाठी हजेरी लावली. यावेळी या कुस्त्यांचे पंच म्हणून रोहित आमले ( आंतरराष्ट्रीय पंच), विक्रम पवळे ,तुषार गोळे, निलेश मारणे यांनी विशेष कामगिरी केली .तर निवेदन हे पै. बाबाजी लिमन यांनी केले .

आखाड्याला महिलांच्या २० तर पुरुष गटामध्ये ७० अशा चुरशीच्या लहान मोठ्या कुस्त्या पार पडल्या. या कुस्ती आखाड्या साठी राहुल बालवडकर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचबरोबर नियोजनामध्ये संजय बालवडकर ( गोसेवक), दत्तात्रय बालवडकर (उपाध्यक्ष राष्ट्रीय तालीम संघ), लहू बालवडकर , जालिंदर बालवडकर, गणेश बालवडकर व समस्त बालेवाडी गावठाण यांचे विशेष सहकार्य लाभले.