July 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील मोहन नगर परिसरात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ ‘हर घर मोदी’ अभियान द्वारे मतदारांशी संवाद…

बाणेर :

पुणे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ बाणेर परिसरातील मोहन नगर, म्हाळुंगे परीसरात भाजपा पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन पत्रक वाटून “हर घर मोदी” प्रचार अभियान राबवून २५२ घरात संपर्क साधला.

 

यावेळी या परिसरात राहणाऱ्या जवळपास ७५० मतदारांशी त्यांच्याकडे जावून संवाद साधला. या भागात मतदानाबाबत जागृती करताना स्लिप वाटप, मतदान तारीख, भाजप महायुती उमेदवार श्री मुरली अण्णा मोहोळ यांची माहिती सांगून 13 मे रोजी मतदान करण्याबाबत मतदारांना आवाहन करण्यात आले.

या अभियानात भाजप पुणे चिटणीस लहू बालवडकर, भाजप कोथरूड (उ) मतदारसंघ उपाध्यक्ष कल्याणी टोकेकर, भाजप कोथरूड (उ) मतदारसंघ चिटणीस निकिता माताडे, कोथरूड (उ ) मतदारसंघ महिला मोर्चा सरचिटणीस सौ वैशाली कमाजदार आणि बाणेर बालेवाडी प्रभाग महिला अध्यक्ष सौ हर्षदा थिटे यांनी सहभाग घेतला.