September 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत शिवम बालवडकर यांचा रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा; सरकारी योजनांची माहिती व नोंदणी शिबिराचेही आयोजन..

बालेवाडी :

भाजप युवा मोर्चा, पुणे शहरचे उपाध्यक्ष शिवम बालवडकर आणि भाजपा नेत्या प्रियांका शिवम बालवडकर यांनी आयोजित केलेला रक्षाबंधन कार्यक्रम बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे भागातील महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो माता-भगिनींच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली होती.

 

या कार्यक्रमात महिलांसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर विविध सरकारी योजनांची माहिती आणि नोंदणी करण्याची संधीही महिलांना मिळाली. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि जनधन योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक महिलांनी स्वतःहून पुढाकार घेऊन नोंदणी केली.

ज्येष्ठ महिलांच्या आशीर्वादाने आणि लहान मुलींच्या निरागस हास्याने कार्यक्रमाचे वातावरण अधिकच आनंददायी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये कार्यकर्त्यांचे परिश्रम, स्थानिक नागरिकांचा उत्साह आणि सर्व उपस्थितांचे सहकार्य मोलाचे ठरले, असे शिवम बालवडकर यांनी सांगितले.

संध्याकाळी कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक भगिनीच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव आणि मिळालेले आशीर्वाद हेच या दिवसाचे खरे यश आहे, अशी भावना बालवडकर यांनी व्यक्त केली.