February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेरमध्ये जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन तर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

बाणेर :

गणेशोत्सवाचा उत्साह आता काहीच दिवसांवर आला असून, यंदा उत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनने एक उपक्रम हाती घेतला आहे. फाउंडेशन तर्फे 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत, माऊली गार्डन, बाणेर येथे “पर्यावरणपूरक गणपती बाप्पा मूर्ती कार्यशाळा” आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या सामग्रीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे तंत्र शिकवले जाणार आहे. मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती फाउंडेशनकडून मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जयेश मुरकुटे यांनी सांगितले की, “ही कार्यशाळा केवळ गणेशोत्सवासाठीच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठीही एक महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.”

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क : 7709775034

नोंदणी करण्यासाठी लिंक:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfT1WhxTLYx-QLn_mP21Sa5ZnpmkHMeob89O1_NiFas2yJ1Pw/viewform?usp=sharing&ouid=115596747389396851353