August 27, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूलच्या अस्मि राणेचे सीबीएससी झोनल तायक्वांदो स्पर्धेत यश

लोणीकंद :

न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूल, लोणीकंद येथे नुकत्याच झालेल्या सीबीएससी झोनल तायक्वांदो स्पर्धेत सीएम इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी अस्मि राणे हिने चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवले.

 

या उल्लेखनीय यशाबद्दल एसकेपी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर, सचिव डॉ. सागर बालवडकर, प्रा. रुपाली सागर बालवडकर, सीएम इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या इकबाल कौर राणा तसेच तायक्वांदो प्रशिक्षक जय शिंदे यांनी अस्मि राणेचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.