पुणे मनपाच्या पाहणीदरम्यान २१३ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय
सूस :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, रोड विभाग प्रमुख श्री. अनिरुद्ध पावसकर यांच्या देखरेखीखाली, ज्युनिअर इंजिनिअर श्री शिवानंद पाटील आणि उपअभियंता श्री. दिलीप काळे यांच्या उपस्थितीत सूस – म्हाळुंगे परिसरातील महत्त्वाच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. या पाहणीत स्थायी समितीचे मा. अध्यक्ष बाबुराव चांदेरे हे देखील सहभागी होते.
गेल्या काही वर्षांपासून हिंजवडीसह सूस व म्हाळुंगे भागात मोठ्या प्रमाणावर लोकवसाहतींमध्ये वाढ झालेली आहे. देशभरातून नागरिक या भागात वास्तव्य करण्यासाठी प्राधान्य देतात. परंतु वाढत्या रहिवाशी संकुलांसोबतच वाहतुकीचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कोंडीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वेगाने पावले उचलली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सनी वर्ल्ड समोरील खिंड फोडून रस्ता रुंद करण्यासाठी अंदाजे ५ ते ७ मीटरपर्यंत खणकाम व खोलीकरण करण्याची गरज असल्याचे निरीक्षण करण्यात आले. पाहणी व मोजमाप केल्यानंतर या रस्त्याची एकूण लांबी २१३ मीटर आणि अंतिम रुंदी आर.पी.नुसार २४ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंजवडी तसेच चाकण परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून सकाळी ६ वाजताच हा पाहणी दौरा पार पडला. त्याच धर्तीवर सूस – नांदे परिसरातही नागरी वस्ती झपाट्याने वाढत असून, आयटी पार्क हिंजवडीतील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर या रस्त्यांचा वापर करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचसाठी पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. बाबुराव चांदेरे यांनी कोंडीमुक्त बाणेर-बालेवाडी-सूस व म्हाळुंगेसाठी कंबर कसल्याचे दिसून येते.
“रस्त्याच्या रुंदीकरणामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. काम लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रशासनाशी सतत समन्वय ठेवू.”
– मा. श्री. बाबुराव चांदेरे
(मा. अध्यक्ष- स्थायी समिती, पुणे महानगरपालिका)



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा