पाषाण :
पाषाण येथे रक्षाबंधन निमित्त साधत मा. नगरसेवक श्री. प्रमोद नामदेव निम्हण आणि मा. नगरसेविका सौ. सुषमाताई निम्हण यांच्या वतीने घरकाम करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ ‘एक जनकल्याण योजना’ शिक्षण कौशल्य विकास आणि आरोग्य विमा याचा लाभ मिळवून देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला घरकाम काम करणाऱ्या महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ही योजना दि. ०६ ऑगस्ट २०२५ पासून सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश समाजातील सर्व गरजू महिलांना आवश्यक सेवा मिळवून देणे आहे, जसे की शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य.
या योजनेत खालील सेवांचा समावेश आहे:
* जनश्री विमा योजना: नोंदणीकृत कामगारांसाठी जीवन विमा सुविधा.
* सन्मानधन योजना २०२२: आर्थिक सहाय्य योजना
शैक्षणिक सहाय्य: शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती, जी रु. २,५०० ते रु. १०,००० पर्यंत (इयत्ता १ ते १२ वी). तसेच, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रु. २०,००० ते १,००,०००पर्यंत शिष्यवृत्ती
* आरोग्य योजना: प्रसूतीसाठी रु. १५,००० ते रु. २०,००० पर्यंत आणि गंभीर आजारांसाठी रु. १ लाख पर्यंत मदत. अपंगत्वासाठी रु. २ लाख, ऊर्जा योजना सह आणखी सुविधा.
* सामाजिक सुरक्षा योजना व आर्थिक सहाय्य : नैसर्गिक मृत्यु रु. २ लाख आणि अपघाती मृत्यू झाल्यास रु. ५ लाख पर्यंत आर्थिक मदत. विधवा आणि अपंग व्यक्तींना विविध सुरक्षा योजना.
* भांडी संचय यजना : मोफत स्वयंपाकाच्या भांड्यांची किट
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदारांना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
* आधार कार्ड
* रेशन कार्ड
* बँक पासबुक
* पासपोर्ट आकाराचा फोटो
योजनेसाठी अर्ज छत्रपती शिवाजी चौक, पाषाण, पुणे-४११००९ येथील प्रमोद नामदेवदादा निम्हण जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध आहेत.


More Stories
पाषाण कार्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन
परिहार चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचे आश्वासन; सनी निम्हण यांचा पाठपुरावा
पेरिविंकल स्कूलमध्ये ‘योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा