पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पौड शाखेत शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह स्थानिक मान्यवरांनीही सहभाग घेतला.
यावेळी प्रशालेच्या संचालिका शिवानी बांदल आणि मुख्याध्यापिका वीणा कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पौड गावचे सरपंच बाबा आग्नेन, उपसरपंच प्रीती आग्नेन आणि माजी उपसरपंच मोनाली ढोरे उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी झेंडा गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका वीणा कदम यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाबद्दलची निष्ठा व्यक्त केली. तर, संचालिका शिवानी बांदल यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल आणि संचालिका रेखा बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. मुख्याध्यापिका वीणा कदम, पर्यवेक्षिका नेत्रा काकडे यांच्यासह सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. संस्कृती पिंगळे आणि धनश्री जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा