बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित, पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल बावधन मध्ये 79 वा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे श्री. डॉ. प्रसन्न ढोरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली. तसेच विविध स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रेरणा देणारे विद्यार्थ्यानी स्वातंत्र्य लढ्याचा संग्राम, भारत मातेच्या स्वातंत्र्याचा जयघोष, स्वतंत्र भारताचा पहिला जयघोष असे नाट्य सादर केले.
यावेळी प्रमुख पाहुणे, श्री. डॉ. प्रसन्न ढोरे सर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या देत, स्वातंत्र्य म्हणजे काय व त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर यांनी मुलांना प्रकृतीने दिलेले स्वातंत्र्य कसे उपभोगावे व प्रत्येक कार्यक्षम व्यक्ती कसा देश सेवा करतो हे समजावून सांगितले. आजचे विद्यार्थी हे उद्याचा विकसित भारत घडवतील असा विश्वास व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास बावधनचे उपसरपंच श्री. वनराज दगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार)युवा नेते सुर्यकांत भुंडे, विनोद माझिरे (संस्थापक मुळशी पत्रकार संघ), श्री.सदाशिव घुले(अध्यक्ष हिमालया नागरी सहकारी पतसंस्था)आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल यांचे देखिल मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका शुभदा कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षीका सायली गायकवाड, शिरीन काझी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली.



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा