स्वारगेट :
मल्टिमोडल हब या प्रकल्पामुळे स्वारगेटच्या केशवराव जेधे चौकाचा कायापालट होणार असून, परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मेट्रो-पीएमपी-एसटी अशा सर्व सेवांच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार असून, उद्योग व्यवसायांना गती मिळणार असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज पर्वती मतदारसंघात तुळशीबाग कॉलनी, तळजाई वसाहत, चव्हाण नगर, पद्मावती, शिवदर्शन परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, श्रीनाथ भिमाले, करण मिसाळ, राजू शिळीमकर, सुभाष जगताप, श्रीकांत पुजारी, अनिल जाधव, गणेश घोष, विशाल पवार, श्रुती नाझीरकर, विकास कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोहोळ पुढे म्हणाले, या प्रकल्पामुळे भुयारी मेट्रो आणि स्वारगेटचे एसटी स्थानक एकमेकांशी जोडले जाणार आहे. मेट्रोच्या मल्टिमोडल हबमध्येच पीएमपीचे राजश्री शाहू बस स्थानक होणार आहे. कुठूनही कुठे जाण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी एकाच ठिकाणी मिळणार आहे. हबमध्ये व्यावसायिक जागा विकसित केल्या जाणार आहे. मॉल, मल्टिफ्लेक्स आणि इतर व्यवसायासाठी जागा दिली जाणार. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.


More Stories
ट्रॅकवर खिळे, मैदानात दारूच्या बाटल्या म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम मधे खेळाडूंच्या स्वप्नांचा चुराडा, सराव सोडून मैदान खासगी इव्हेंट साठी उपलब्ध..
बालेवाडीतील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे स्नेहवनमध्ये ‘बालदीपोत्सव ५’ उत्साहात साजरा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील १८० मुलांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित..
*औंध-बोपोडीतील चिमुकल्यांच्या कल्पकतेला मिळाली नवी झळाळी!**मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन**नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*