औंध :
शनिवार दि. 20 एप्रिल 2024 औंध विरंगुळा केंद्र येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुजन करून अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेची नवं उद्योजकाना माहिती देण्यात आली. उद्योग व्यवसाय सूरु करताना व्यवसायिक कर्ज संबधित तरूणांना माहिती मिळून त्यांच्या अडचणी दुर करण्यासाठी जनसेवा बँक आणि गणेश कलापुरे मित्र परिवार वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
योजना काय आहे कशी कार्यान्वित होते मराठा तरुण व्यावसाईकांना व्यावसायिक कर्ज कसे मिळू शकते, त्यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत याची सविस्तर माहिती तसेच व्यवसायात येणाऱ्या अडचणी भांडवल पुरवठा याची माहिती गणेश कलापुरे यांनी दिली.
जनसेवा बॅंकचे मार्केटिंग हेड अभिजित केळकर साहेब यांनी बँकेच्या ध्येयधोरणावर कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले. शिरीष चिरपूटकर औंध जनसेवा बँक शाखेचे मॅनेजर यांनी कागदपत्र पुर्ण कसे करावे सिबिल स्कोर कसा वाढवावा याविषयी मार्गदर्शन केले आणि नवं उद्योजकाना साह्य करण्याचे आश्वासन दिले.
गणेश छिद्रवार या तरुण व्यावसायिकाने जनसेवा बँक आणि इतर आर्थिक पुरवठा करणाऱ्या संस्था यातील फरक सांगितला आणि कमी व्याजदराने व्यावसायिक कर्ज तत्परतेने दिल्याबद्दल चिरपूटकर साहेब, लहुजी धोत्रे साहेब, जनसेवा बँक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
ऍडव्होकेट श्रीकांत दळवी यांनी व्यावसायिकाना कायदेशीर मोफत सल्ला देणे व्यावसायिक आणि बँक यामधील होणारे करार करणे आणि मोफत सल्ला देणे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन लहुजी धोत्रे यांनी केले.आभार प्रदर्शन गणेश कलापुरे यांनी केले. हा कार्यक्रम जनसेवा बँक आणि गणेश कलापुरे मित्र परिवार यांनी आयोजित केला होता.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..