February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

मल्लसम्राट कै.पै.अनंता पाडाळे यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेत ‘अनंता पाडाळे चषक २०२४’ चे म्हाळूंगे क्रिकेट क्लबने पटकाविले विजेतेपद..

म्हाळुंगे :

मल्लासम्राट कै.पै.अनंता पाडाळे यांच्या स्मरणार्थ अनंता पाडाळे चषक २०२४ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक म्हाळूंगे क्रिकेट क्लब, म्हाळूंगे, द्वितीय क्रमांक सुनील कळमकर स्पोर्ट्स क्लब, हडशी, तृतीय क्रमांक काळभैरवनाथ क्रिकेट क्लब, मारुंजी, चतुर्थ क्रमांक बावधन स्पोर्ट्स क्लब, बावधन यांनी पटकावला.

या स्पर्धेला प्रथम बक्षीस मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे व पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या तर्फे १ लाख रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. द्वितीय बक्षीस सौ. पूनमताई विशाल विधाते व मा.श्री. सुखदेव रामदास कोळेकर( मा. उपसरपंच) यांच्या तर्फे ७५,०००/- देण्यात आले. तृतीय क्रमांक मा. श्री. दत्तात्रय नामदेव भरणे व मा. श्री निलेश सुरेश पाडाळे यांच्या तर्फे ५०,०००/- देण्यात आले. चतुर्थ क्रमांक मा.श्री.विशाल गंधिले, मा. श्री.शैलेन्द्र कदम व मा.श्री. योगेश सुतार यांच्या तर्फे ३०,०००/- देण्यात आले.

या स्पर्धेचे आयोजक कै.पै.अनंता पाडाळे स्पोर्ट्स फाऊंडेशन, म्हाळूंगे तर्फे करण्यात आले. निलेश पाडाळे, सागर पाडाळे, हरी पाडाळे, सागर पाषणकर, राजू तरस यांनी विशेष परिश्रम घेतले.

या स्पर्धेच्या बक्षीसवितरण समारंभाला राहुल दादा बालवडकर,पूनमताई विधाते, विशाल गांधिले,वामनराव कोळेकर,नंदुशेठ पाडाळे, बाळासाहेब बाजीराव पाडाळे, बाळासाहेब खैरे,अर्जुन पाषणकर,सुखदेव कोळेकर, अरुण सुतार,मुरलीधर गायकवाड,दिलीप पाडाळे,गोपाल खैरे, विलास पाडाळे, संजय खैरे उपस्थित होते.