पाषाण :
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नवचैतन्य हास्य योग क्लब पाषाण टेकडी, मुरकुटे उद्यान बाणेर व स्मार्ट सिटी गार्डन बालेवाडी फाटा येथील हास्य क्लबचे सभासद व ज्येष्ठ नागरीकांशी प्रत्यक्ष भेटुन महायुतीचे पुणे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी संवाद साधला.
यावेळी जेष्ठ नागरिकांनी मुरलीधर मोहोळ यांनी महापौर असताना कोरोना काळात केलेला कामाला उजाळा देत विकासाच्या दृष्टीने भक्कम नेतृत्व मिळावे म्हणून आम्ही मुरलीधर मोहोळ हे खासदार व्हावे यासाठी ठामपणे पाठीशी उभे आहोत अशी भावना व्यक्त केली.
नागरिकांनी आम्हाला कर्ज रुपी मतदान करत असतात आणि आम्ही ते निवडून आल्यावर व्याजासहित विकास काम रूपाने कर्ज फेडायचे असते. नागरिकांचे प्रेम पाहून ते आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर निवडून देतील याचा आत्मविश्वास वाटतो : मुरलीधर मोहोळ ( महायुतीचे भाजप उमेदवार पुणे लोकसभा)
यावेळी बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी-सुस-म्हाळुंगे भागातील सर्व महायुतीचे सर्व मा.नगरसेवक, नेते, सभासद, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी