September 17, 2024

Samrajya Ladha

पाषाण, बाणेर, बालेवाडी परिसरातील महायुतीच्या पदाधिकारी बैठकीत मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा केला संकल्प..

पाषाण :

आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाषाण, बाणेर बालेवाडी परिसरातील महायुतीची समन्वय बैठक पाषाण येथील योग भवन मध्ये पार पडली. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ यांना प्रचंड बहुमताने निवडून आणून पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा महासंकल्प आजच्या या बैठकीत करण्यात आला.

या बैठकीस भाजपा पुणे शहर सरचिटणीस पूनित जोशी, कोथरूड विधानसभा समन्वयक शाम देशपांडे, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल समन्वयक प्रकाश बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, भाजपा माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, राष्ट्रवादी काँग्रेस माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर, भाजपा ओबीसी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सायकर, चिटणीस लहू बालवडकर, चिटणीस राहुल कोकाटे, सचिन दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल विधाते, मनसे नेते सुहास बापू निम्हण, भाजपा नेत्या उमा गाडगीळ, रोहन कोकाटे, मनसे नेते अनिकेत मुरकुटे, भाजपचे मोरेश्वर बालवडकर,सचिन सुतार, आरपीआयचे नेते संतोष गायकवाड, राष्ट्रवादीचे मनोज बालवडकर, प्रशांत निम्हण, भाजप चे उत्तम जाधव, पार्थ रणपिसे, तेजस बामगुडे, ओमकार निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते.