September 17, 2024

Samrajya Ladha

सोमेश्वर फौंडेशनच्यावतीने “सुपर सनी विक” चे आयोजन, विविध खेळांच्या भव्य स्पर्धा तसेच पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल चे आयोजन..

पाषाण :

युवा उद्योजक आणि मा. नगरसेवक श्री सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमीत्त (२० फेब्रुवारी) क्रीडाक्षेत्राला व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध खेळांच्या स्पर्धांचे सुपर सनी विक (१७ ते २५ फेब्रुवारी) अंतर्गत आयोजन सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. तायक्वांदो, स्केटींग, बॉक्सिंग, पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल आणि भव्य डे – नाईट टेनिस बॉल क्रिकेट जिल्हा स्तर अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोमेश्वर फौंडेशनचे उमेश वाघ आणि प्रताप जाधव यांनी दिली.

बॉक्सिंगच्या स्पर्धा १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणार असून या स्पर्धांमध्ये आजपर्यंत २२७ स्पर्धकांनी नांव नोंदणी केली आहे त्यापैकी ९६ मुलींनी सहभाग नोंदवला असून जिल्हा
पातळीवर हा एक विक्रम आहे. या स्पर्धा मुले आणि मुलींसाठी सब ज्युनिअर, ज्युनिअर, युथ आणि सिनीअर या वयोगट / वजनगटात घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बॉक्सिंग असोसिएसनचे सचिव मदन वाणी यांनी दिली. या स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला असून स्पर्धेसाठी गोखले नगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रींग उभारण्यात येणार आहे. स्पर्धा रोज दुपारी २:०० वाजल्यापासून सुरु होतील. स्पर्धकांची वजने व मेडकील १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०० ते १०:०० दरम्यान स्पर्धेठिकाणी होतील. स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना मेडल, प्रशस्तिपत्र तसेच सांघिक विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख पारितोषिके आणि चषक देण्यात येतील. स्पर्धेमधील सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा प्रकाश झोतात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धा पारदर्शक होण्यासाठी आणि उदयोन्मुख खेळाडूंना देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर वापरण्यात येणारी कॉम्प्युटर स्कोअरींग सिस्टीम जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रथमच वापरण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका १६ फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा शनिवार आणि रविवार दि. २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी हॉटेल सेंट्रल पार्क येथील भव्य हॉल मध्ये होणार असल्याची माहिती पुणे तायक्वांदो ऑर्गनायझेसनचे अध्यक्ष मिलींद पठारे यांनी दिली. मुले आणि मुलिंसाठी सब ज्युनिअर, कॅडेट आणि ज्युनियर या वयोगटात एकूण ३८ वजनीगटात या स्पर्धा होणार असल्याची माहिती स्पर्धा संचालक प्रविण बोरसे यांनी दिली. स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना मेडल, प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिके देण्यात येतील तसेच सर्वसाधारण विजेत्या व उपविजेत्या संघास आकर्षक चषक देण्यात येतील. स्पर्धेमधील सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये आजपर्यंत ५०० हुन अधिक खेळाडूंनी नांव नोंदणी केली आहे. जिल्हा स्तरावरील या स्पर्धा प्रथमच संपूर्णपणे ESS (इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग सिस्टीम) द्वारे आणि ऑक्टोगन मॅटवर घेण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या प्रवेशिका २२ फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

स्केटींग स्पर्धा रविवार २५ फेब्रुवारी रोजी रोडरेस प्रकारात होणार असल्याची माहिती स्केटींग असोसिएशन ऑफ पुणेचे सचिव अशोक गुंजाळ यांनी दिली. या स्पर्धा कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनीअर या वयोगटात मुले आणि मुलींसाठी होतील. इनलाईन, क्वॉड, रिक्रीएशनल इनलाईन व बिगीनर्स प्रकारात स्पर्धा होतील. स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना मेडल, प्रशस्तिपत्र देण्यात येतील तसेच सर्वसाधारण विजेत्या व उपविजेत्या संघास आकर्षक चषक देण्यात येतील. या स्पर्धेत आजपर्यंत ३०० हुन अधिक खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला असून या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत प्रचिती लगड, श्रेया महाजन, संचित गावडे, रीहान बाफना, शर्व वाळके, शिवाय महाजान व श्लोक भेलके या राष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंनी आपल्या प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेच्या प्रवेशीक २३ फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने भव्य डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा औंध येथील इंदीरा गांधी प्राथमिक शाळा मैदानावर दिनांक २० ते २५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. पहिल्या चार विजेत्या संघांना एकूण रुपये ८५,५५५/- ची रोख पारितोषिके आणि चषकदेण्यात येण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या प्रवेशीक १८ फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएसनच्या मान्यतेने विवध अंतराच्या “पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फार अमृतकाल” स्पर्धा रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. २१, १०, ५ आणि ३ किमी अंतराच्या या स्पर्धा होतील. शिक्षणाचे माहेरघर पुणे आणि औद्यगिक क्रांतीचे पिपरी चिंचवड या दोन ऐतिहासिक शहरामध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने/विचाराने प्रथमच “पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फार अमृतकाल” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामधून या स्पर्धेस सकाळी ५:३० वाजता सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत विक्रमी २१ हजारहुन अधिक नागरिकांनी या स्पर्धेमधील आपला सहभाग निश्चित केला आहे. या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना टी शर्ट, गुडी बॅग, मेडल, ई टाईमिंग सर्टीफिकेट, वैद्यकीय मदत, हायड्रेशन सपोर्ट मोफत पुरविण्यात येणार आहे. स्पर्धेमधील सर्व वयोगटामधील पुरुष व महिला विजेत्या स्पर्धकांना एकूण रुपये ५,५५,५५५/- रुपयांची बक्षिसे व पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेमधील सर्व सहभागी खेळाडूंना मेडल्स, प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या नांव नोंदणीसाठी www.sunnynimhan.com या वेबसाईटवर जाऊन नांव नोंदणी करावी.