May 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न..

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे संशोधक श्री अनंत पत्की, सिनिअर सायंटिस्ट, इस्त्रो, व मा मंजुषा नाईक, डेप्युटी कमिशनर, जीएसटी, पुणे डिव्हिजन, याच बरोबर पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर, उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संजय खरात हे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डाॅ संजय खरात म्हणाले गुणी विद्यार्थी या महाविद्यालयात तयार होत आहेत. महाविद्यालय अडथळ्यातुन पार होऊन विद्यार्थ्यांना पुढे नेत आहे. सगळ्या उपक्रमातून विद्यार्थी घवघवीत यश मिळवत आहेत. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी यांचा खुप मोठा पाठिंबा आम्हाला आहे.

प्रोत्साहनपर बोलताना प्रो अनंत पत्की म्हणाले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यार्या संस्था हि देशाची गरज आहे त्यातील तुमचे महाविद्यालय हे एक आहे. इस्त्रोच्या वेगवेगळ्या संशोधनाची माहिती त्यांनी दिली. कम्युनिकेशन, सॅटेलाईटस्, हवामान माहिती, मॅप मेकिंग ई महत्वाची कामे त्यांनी समजून सांगितली. फोकस,मनापासून कष्ट करणे,फॅशन जिद्द, शिस्त, साधेपणा हे गुण इस्रोचे पहिले चेअरमन श्री विक्रम साराभाई यांचे गुण त्यांनी सांगितले. त्यांचा साधेपणा, कुठलेही काम अचुक करण्याची हतोटी हे गुण आत्मसात करा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मा मंजुषा नाईक या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी आहेत. ’आमचे पत्र्याच्या शेडमधिल महाविद्यालय आज तीन बिल्डिंग मधे विस्तारीत झाले आहे याचा सार्थ अभिमान मला वाटतो. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. सातत्याने प्रयत्न करत रहा आणि सतत यश मिळावा याला आज पर्याय नाही असे त्या म्हणाल्या. गळ्याची शस्त्रक्रिया झाली असतानाही त्या आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या.

ईनर व्हील क्लब, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग या सगळ्यांनी जाहिर केलेल्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना त्याचे वितरण केले गेले. या बरोबर शैक्षणिक गुणवत्ता, कला, वेगवेगळ्या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थी इ. पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. विशेष पारितोषिक ‘ फ्राईड आँफ माॅडर्न ब्लेंडेड केमेस्ट्री गायत्री धर्माधिकारी हिला तर विशेष कलाकार म्हणून गिरीश कुलकर्णी याला मिळाले.
गणेशवंदना संपदा दिवेकर हिने सादर करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. डाॅ शुभांगी जोशी उपप्राचार्य यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली.

प्रा मिनल जबडे, प्रा शिवानी वारे, प्रा रेवती नगरकर यांनी बक्षीसांचे वाचन केले. सूत्र संचलन डाॅ अनुराधा रौंदळे यांनी केले. आभार प्रदर्शन डाॅ ज्योती गगनग्रास यांनी केले.प्रा डाॅ माधुरी कुलकर्णी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमासाठी पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांनी प्रोत्साहन दिले.