November 14, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

गणेशखिंड येथिल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स,सायन्स अँड काॅमर्स येथे इंटरॅक्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

गणेशखिंड :

गणेशखिंड येथिल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स,सायन्स अँड काॅमर्स येथे इंटरॅक्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात मा आनंद सागर, प्रा शामकांत देशमुख, श्री दीनानाथ खोलकर टी सी एस एक्स एच आर, पी ई सोसायटीचे उपकार्तवाह प्रा सुरेश तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांचे प्राचार्य डॉ संजय खरात यांनी स्वागत केले. गेले तेवीस वर्षे इंटरॅक्शन ऍक्टिव्हिटी चालू आहे .त्यामध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग होत आहे. महाविद्यालय A+ ग्रेड नामांकित आहे.

मा दिनानाथ खोलकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नवनवीन टेक्नॉलॉजी यूपीआय पेमेंट, गुगल पे , आदी यांची माहिती दिली. श्री आनंद सागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुमच्याकडे कोणत्या गोष्टी आहे त्यापेक्षा तुम्ही त्याच गोष्टींमध्ये काय करू शकता याकडे लक्ष केंद्रित करावे.”विजय होणे हे महत्त्वाचे नसून तुम्ही त्यामध्ये सहभाग घेत आहात हे खूप महत्त्वाचे आहे”.

प्रा शमाकांत देशमुख त्यांनी कोणते ॲप्लिकेशन व ॲप्स येत आहेत त्यामधील फीचर्स व कशाप्रकारे वर्कआउट होतात हे उदाहरणाद्वारे सांगितले. “ नविन कल्पना आमलात आणा आणि त्या कल्पनेचे पायोनिअर व्हा”.

याच कार्यक्रमादरम्यान बीएससी डेटा सायन्स नवीन अभ्यासक्रम महाविद्यालयात चालू करण्यात आला.तसेच प्राचार्य व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.‌ या कार्यक्रमात १०००+ विद्यार्थी व २५+ महाविद्यालये सहभागी होती. वाडिया महाविद्यालयाला चँम्पिअन ट्राॅफी, इंदिरा महाविद्यालयाला अप्रिसिअेशन ट्राॅफी मिळाली. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा पूजा बहिरट व प्रा प्रेरणा शेर्ला यांनी केले. डाॅ शुभांगी भातांब्रेकर यांनी मार्गदर्शन केले.