महाळुंगे (पाडाळे), :
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक ऐक्य दृढ करण्यासाठी महाळुंगे (पाडाळे) येथे एक आगळावेगळा कार्यक्रम रंगला — “न्यू होम मिनिस्टर – खेळ रंगला पेठणीचा!” या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा नेत्या प्रियांका विनायक चिव्हे आणि भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलाचे चिटणीस विनायक शिवाजी चिव्हे यांच्या वतीने करण्यात आले होते. महिलांसाठी खास रचलेल्या या मनोरंजक कार्यक्रमाला हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. खेळ, हास्य आणि आनंदाचा सुंदर संगम अनुभवत परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून महिलांना आपली कला, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण प्रदर्शित करण्याची संधी मिळाली.
या यशस्वी उपक्रमासाठी आयोजकांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलांच्या सामाजिक सक्षमीकरणासाठी आणि एकतेसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला आहे.
प्रसंगी मंडलाध्यक्ष लहू आण्णा बालवडकर, मा. नगरसेवक अमोल बालवडकर, मा. नगरसेविका स्वप्नालिताई सायकर, मा. नगरसेविका ज्योती ताई कळमकर, भाजपा नेते गणेश कळमकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, भाजपा पुणे शहर युवा मोर्चा संपर्क प्रमुख शिवम बालवडकर तसेच कोथरूड उत्तर मंडलातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्या, महाळुंगे गावचे सरपंच, मा. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!