बालेवाडी :
महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या दिशेने महिलांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे, या उद्दिष्टाने बालेवाडी येथे पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज बालवडकर यांच्या वतीने “स्कुटी शिका आणि स्वावलंबी व्हा” हा आगळा-वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदेरे, नगरसेविका सौ. रोहिणीताई चिमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. राहुलदादा बालवडकर, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. समीरभाऊ चांदेरे यांच्या शुभहस्ते पार पडले.
“प्रत्येक महिला सक्षम, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी व्हावी” या भावनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात बालेवाडी परिसरातील माता-भगिनींसाठी फक्त ₹१५०० मध्ये टू-व्हिलर प्रशिक्षणाची सुविधा देण्यात आली आहे.
“स्कुटी आमची, पेट्रोल आमचे!” या घोषवाक्यासह महिलांच्या स्वावलंबनासाठी हा उपक्रम ठोस पाऊल ठरत आहे.
या उपक्रमात आजपर्यंत १७४ महिलांनी नोंदणी केली असून, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या प्रसंगी श्री. दत्तात्रय बालवडकर पाटील, श्री. ज्ञानेश्वर बालवडकर, श्री. विशाल बालवडकर पाटील, श्री. प्रकाश बालवडकर, श्री. महेश बालवडकर, श्री. कृष्णा बालवडकर, बाळा नेटके, मोरेश्वर बालवडकर, संजय कणसे, अमित टकले, दिपक बोडके, प्रसाद बालवडकर, सुरज गच्चे, दत्ता कसबे, प्रतिक पाटील आणि मित्र परिवार उपस्थित होते.
या कार्यक्रमास परिसरातील महिला आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने केलेला हा छोटासा परंतु प्रभावी प्रयत्न समाजातील महिलांना आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी दिशा देणारा ठरला आहे.





























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम