बालेवाडी :
बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यवृद्धीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार पक्ष ) चे नेते संदीप धारुजी बालवडकर यांच्या वतीने आज बालेवाडी गावात शुभम रेसिडेन्सी, द्वारका रेसिडेन्सी आणि सेलेब्रेशन रेसिडेन्सी या सोसायट्यांसाठी ओपन जिमचे भूमिपूजन करण्यात आले.
या भूमिपूजन कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी राजभाऊ बालवडकर, धारुजी बालवडकर, संजय बालवडकर, अजय बालवडकर, दौलत धेंडे, बजरंग टकले, मंगेश कांबळे, महेश भांडे, राजेश दिनकर बालवडकर, विक्रम देशपांडे, गणेश चव्हाण, मुकेश चौधरी, विनायक गायकवाड, रोहित धेंडे, वैभव धेंडे तसेच सोसायटीचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना आरोग्यदायी आणि तंदुरुस्त जीवनशैलीकडे वळण्यासाठी एक उत्तम सुविधा उपलब्ध होणार असल्याचे संदीप (धारुजी) बालवडकर यांनी सांगितले. तसेच पुढील काळात बालेवाडीत आणखी विविध सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!