बाणेर :
बाणेर आणि सुस रोड परिसरात “मिशन निर्मल” या उपक्रमांतर्गत अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे सलग काही दिवस स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले. दिनांक ३ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान परिसरातील अनेक सोसायट्या, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. नागरिक, स्वयंसेवक आणि स्थानिक रहिवाशांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळाला.
या कालावधीत स्वच्छता करण्यात आलेल्या सर्व ठिकाणांमध्ये खालील सोसायट्या आणि परिसराचा समावेश होता —
📍 स्वच्छता मोहिम राबविण्यात आलेले परिसर आणि सोसायट्या:
मोरया नगरी, भांडे नगर, सुस रोड, बाणेर, पल्लोड फार्म, रिव्हिरेसा, बीएसएनएल ऑफिस लेन, वीरभद्र नगर (लेन क्र. १ ते १०), शह्याद्री फार्म्स, तापकीर वस्ती, ललित इस्टेट, अंजोर सोसायटी लेन, डी.एस.के. विद्यानगरी, ओ कलेक्शन हॉटेल, फोर विंड्स, टर्टल टर्बाईन्स, पारिजात, वरद फडणीस, आई बंगला, बसेरा मंजिल, मक्की पार्क, दुर्गा निवास, अथर्व बंगला, कपिल रेसिडेन्सी, तिरुमला हाइट्स, दुर्गा हाइट, ऑर्किड नेस्ट, प्लॅटिनम ९, हेरंब, साई पॅराडाईज, ५२ ग्रीन वूड्स, माऊंट युनिक रेसिडेन्सेस, किरण सोनीगर, विहंग अपार्टमेंट, नविन ए. आय. सिस्टम, समृद्धी व्हिला, गुरुमाऊली विहार, कॅसिया, आरंभ रेसिडेन्सी, ड्यू ड्रॉप्स, एमराल्ड व्हिस्टा, साई आशिर्वाद, गुरुमाऊली विहार, आरंभ रेसिडेन्सी, ड्यू ड्रॉप्स, एमराल्ड व्हिस्टा, मेट्रो लाईन गर्ल्स पी.जी., शंकर स्मृती, श्री सावता संकुल, श्री हरजीबाबा मंदिर, नानांची कृपा, क्रांती हाइट्स, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पी.एम.सी. औंध क्षेत्रीय कार्यालय, रुक्मिणी निवास, शिवतीर्थ, एस.व्ही. पी.जी., रामकृपा, महादेव हाइट्स, वसंत विद्या, अक्षय वैभव, डॅफोडिल्स, ॲझेलिया अपार्टमेंट्स, रेनू इलेक्ट्रॉनिक्स, प्रथम ब्लिस, सनबेला जेनेसिस, परवानी’स, तेजस एलिशियन, माणिक, सिंकथ्रेड्स कम्प्युटिंग, विश्वा, अरिहंत, मालती, सूर्या, रत्नदीप, सोहम, पेनिन्सुला, इंटरमीडिया केबल कम्युनिकेशन्स, सरस्वती, कृष्णा राणावरे पथ, औदुंबर बंगला, द नेस्ट हेरिटेज, पर्ल, द पाल्म्स व्हिला, गुलमोहर बंगला, तारा बंगला, ओशियाना बंगला, प्रांजली अपार्टमेंट, श्लोक्स होम, सांब्याल्स खजूर व्हिला, कनक, आरिन अपार्टमेंट, अयान अपार्टमेंट्स, म्हाळसा बंगला, ओंकार अपार्टमेंट, राजशैलम, संकल्प अपार्टमेंट, लॅक्मी फूड्स, ट्रीबो ट्रिप लोटस, गंधर्व प्लाझा, साई सावली अपार्टमेंट, प्रेमप्रभा, मित्र, रानडे रिअल्टर्स, पूर्णा, 7 प्रथमेश, रनवाल सिल्वन ओक्स, रेनबो अपार्टमेंट, माधव, साई श्रीया बिल्डर्स, श्रीनिवास, नागेश, लँडमार्क डेलोनिक्स, लँडमार्क रेसिडेन्सी, श्री हरी-1, अथर्व, श्री हरी-3, वरद, तारेस्, कुबेर कुंज, सिद्धांत रेसिडेन्सी, एस्केप, सहज, उत्कर्षा, सम्राट अशोक सी.एच.एस., सिएरा व्हिस्टा, शांताई, सुकृत, भूवी, लोटस रेसिडेन्सी, नीव आरव, तुषार, आयलेक्स अल्टिस, निशांत बंगला, सिद्धांत एलिगन्स, कृपा सिंधू, व्हाईटवॉटर हाऊस, शिवालय, संस्कार, तथास्तु, ऑल करेक्ट, निकुंज, अविष्कार, चिनार बंगला, आयलेक्स ब्लिस, मानस ग्रीन, मल्हार बंगला, मुप्प्रा केरळ आयुर्वेद, निर्माण व्हिला, स्वामी अपार्टमेंट्स, सिल्व्हर स्प्रिंग्स A व B, क्रिस्टल सोसायटी, ट्रँग्युलर अपार्टमेंट, सुमन अंकुर बंगला, श्रीगुरुनिलयम, शालिनी अपार्टमेंट, साई दुर्गा बंगला, सोनेट अपार्टमेंट, कपिल बकुळ, ट्रेमाँट, शमुघ, सिद्ध चिंतन, मिनिमल स्ट्रोक, स्वप्नशिल्प बंगला, मिदोरी सोसायटी, ॲव्हेन्यू सृष्टी सोसायटी, श्री निवास (सरदेसाई), कॉर्पोरेट स्टे, मिहीर क्लासिक I आणि II, अंबर बंगला, पर्ल बंगला, सुप्रभात मेंसन्स, सिमनन हाऊस, स्वाती प्रसाद, स्वरगंध, श्रावणी रेसिडेन्सी, अंजन हाउसिंग सोसायटी, बेलफ्लॉवर, माणिक पद्मा स्मृती, द बॅलन्स ब्र्यू, डेझी मेरिगोल्ड, वासुकमल, स्मार्ट किसान मार्केट, केअर बाइट किचन, सह्याद्री फार्म्स रहिवासी संघ.
या मोहिमांदरम्यान स्वयंसेवकांनी रस्ते, सोसायटी परिसर, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणांवरील वाढलेले गवत, प्लास्टिक, मलबा आणि साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ केला.
पुणे महानगरपालिका शाळा क्र. १५१ ब, बाणेर येथे देखील विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा सावंत यांनी अमोल बालवडकर फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले.
या मोहिमेमुळे बाणेर परिसरात स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढली असून, नागरिकांनी “आपला परिसर – स्वच्छ परिसर” हा संदेश दिला. अमोल बालवडकर यांनी बालेवाडीतील यशानंतर आता बाणेर परिसरात “मिशन निर्मल” अभियानाचा धडाका सुरू ठेवत शहर स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
🧹 मिशन निर्मल – स्वच्छ बाणेर, सुंदर बाणेर!



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले