May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंधच्या”श्री शिवाजी विध्यामंदिरामध्ये १९९९ च्या विद्यार्थ्यांचा २५ वर्षांनी पुन्हा एकदा भरला वर्ग”

औंध :

औंध येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविदयालयात १९९९ मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी व शिक्षक 25 वर्षांनी पुन्हा एकत्र आले.

 

या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन झाल्यानंतर दिवंगत माजी विदयार्थी व दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहन्यात आली राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांनि स्वतःचा परिचय दिला,सर्वांनी शाळेतील मेळावा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शॉल, श्रीफळ आणी मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व शाळेला भेटवस्तू दिल्या. तसेच प्रत्येक माजी विदयार्थी मित्र मैत्रिणीला सन्मानचिन्ह देण्यात आले. फोटोग्राफी साठी माजी विद्यार्थी हरिश्चन्द्रे याची मदत झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना रणवरे/बोरडे हिने केले,कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमित रोकडे याने केले तर आभारप्रदर्शन सविता बनसोडे/परभाणे हिने केले.

सर्वांना एकत्रित आणण्याची जबाबदारी अर्चना रणवरे, वैशाली सोनवणे, सविता बनसोडे, रुपाली कांबळे, राहुल शिंदे, विनायक शिंदे, अमित रोकडे, शिवा कांबळे, मनीष रानवडे, हेरंब कलापूरे, राजू दाभाडे, मोनेष रानवडे, सचिन धायरेकर यांनी पार पाडली.