September 19, 2024

Samrajya Ladha

औंध येथील जगदीश नगर, इंदिरा वसाहत येथे विकसित भारत रथ यात्रेचे सचिन मानवतकर यांच्यावतीने स्वागत…

औंध :

पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित “विकसित भारत संकल्प यात्रेत” केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देत मार्गस्थ झालेल्या विकसित भारत रथ यात्रेचे आज औंध येथील जगदीश नगर, इंदिरा वसाहत येथे छत्रपति शिवाजी महाराज नगर चे लाडके आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शना खाली सचिन मानवतकर यांनी स्वागत केले.

याबद्दल माहिती देताना युवा नेते सचिन मानवतकर यांनी सांगितले की, विकसित भारत रथ यात्रेत विविध लोकाभिमुख योजनांचे स्टॉल्स उभारून येणाऱ्या नागरिकांची योजनांसाठी नावनोंदणी करण्यात आली. यावेळी डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून विविध योजनांच्या माहितीची व या योजनांमुळे जनतेच्या जीवनात होत असलेल्या परिवर्तनाची माहिती सांगणारी चित्रफीत सादर करण्यात आली. विकसित भारताच्या या प्रवासाचे आपण सहप्रवासी होत आहोत याचा आनंद सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावर जाणवला.

“विकसित भारत संकल्प यात्रेत” केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे यात चित्ररथ वाहनाबरोबर केंद्र शासनच्या पी.एम स्वनिधी योजना, आयुष्मान भारत जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, आधार अपडेट गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना व पुणे मनपाची शहरी गरीब योजना, मोफत आरोग्य तपासणी अशा विविध योजनांची माहिती वंचित नागरिकांपर्यत पोहोचवण्यात येत आहे. काही पात्र महिलांना प्रधानमंत्री ऊज्वला गॅस योजनेत मोफत गॅस देखील देन्यात आला अशी माहिती सचिन मानवतकर यांनी दिली.

या कार्यक्रमा साठी मा.नगरसेवक प्रकाश ढोरे, मा.नगरसेवक सनी निम्हण, अपर्णा कुऱ्हाडे, संयोजक अजय दुधाने, सागर मदने उपस्थित होते. या रथ यात्रेचे नियोजन सचिन मानवतकर मित्र परिवार यांनी केले.