पाषाण :
माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बसच्या नियमावली सुधारणा करण्यासाठी समिती करावी याकरिता पत्र पाठविले आहे.
याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, पुण्यातील वाघोली भागात नुकताच स्कूल बसचा अपघात झाला. यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले होते या घटनेमुळे पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर वर आला आहे. वास्तविक पाहता राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या स्कूलबस साठी नियमावली बनवली आहे परंतु ह्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. म्हणूनच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बस ड्रायव्हर साठी वेगळे लायसन्स त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन बसेसची नियमित तपासणी तपासणी नवीन स्कूल बस नियमावली बनवणे अशा महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
त्याकरिता नवीन नियमावली बनवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि महाराष्ट्र राज्याच्या इतर मंत्री महोदयांना यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…