June 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना गोल्डन ॲवार्ड मिळाल्याबदद्ल केला सन्मान..

औंध :

औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मा.गिरीश दापकेकर यांना नुकतेच नवी दिल्ली येथे गोल्डन ॲवार्ड मिळाल्याबदद्ल मोरेश्वर बालवडकर यांनी बाणेर बालेवाडी परिसराच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन सन्मानित केले.

गिरीश दापकेकर यांनी पांचगणी नगरपरिषद येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील केलेल्या कामगिरीमुळे, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर गोल्डन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना अगोदर देखिल सन्मानित केले गेले आहे. असे कर्तव्य दक्ष अधिकारी आपाल्या औंध क्षेत्रीय कार्यालयास लाभले हि आनंदाची बाब असून आपल्या परिसरातील समस्या त्यांच्यामुळे मार्गी लागतील असा विश्वास आहे : मोरेश्वर बालवडकर (उपाध्यक्ष :उ.कोथरुड विधानसभा मतदार संघ)

यावेळी सचिन पाषाणकर(अध्यक्ष :उ.कोथरुड विधानसभा मतदार संघ) व सचिन दळवी (सरचिटणीस : उ.कोथरुड विधानसभा मतदार संघ) उपस्थित होते.