February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी आणि पाषाण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सचिन दळवी यांचे औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन..

औंध :

सोमेश्वरवाडी आणि पाषाण भागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी भाजपा कोथरूड विधानसभा (उत्तर) सरचिटणीस सचिन दळवी यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांची भेट घेऊन नागरीकांच्या अडचणी संधर्भात चर्चा केली आणि निवेदन दिले.

सोमेश्वरवाडी येथील विविध भागातील रस्त्यांचे पुन्हा सिमेंट काँक्रेट करण्याबाबत व तसेच रस्त्याच्या मधोमध असलेल्या लाईटीचा खांब व डी.पी स्थलांतरीत करण्याबाबत तसेच सोमेश्वरवाडी, पाषाण परिसरातील नागरिकांच्या पाणी पुरवठा, रस्ता आणि वीजपुरवठा संधर्भात अडचणी सोडविण्यासाठी औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांची भेट घेतली व भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन देऊन चर्चा केली. माननीय आयुक्तांनी देखिल समस्या जाणून घेत लवकरात लवकर प्रत्येक्षात पाहणी करून सोडविण्याची ग्वाही दिली : सचिन दळवी(सरचिटणीस भाजपा कोथरुड उत्तर विधानसभा)

यावेळी निवेदन देताना संतोष सपकाळ, सुनील खुळे, आणि सचिन दळवी मित्र परिवार उपस्थित होते.