August 2, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे बिल्डिंग बांधकामावरून सळई पडून नऊ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू…

बाणेर :

बाणेर येथिल गणराज चौक जवळ वीरा बिल्डर चे बांधकाम सूरु असताना बिल्डरच्याच बेजबाबदार पणामुळे लहान मुलाच्या डोक्यात बिल्डिंग वरून सळईचा गट्टू पडून अपघात झाला व या बाळाचा मृत्यु झाला. अतिशय बेजबाबदार पणे सुरू असलेल्या कामामुळे लहानग्या बाळाचा हकनाक बळी गेला आहे. कॉन्ट्रॅक्टरवर नाही तर बेजबाबदार बिल्डर वर गुन्हा दाखल व्हावा अशी संतापजनक भावना बाळाचे वडील केतन राऊत आणि आई पूजा राऊत यांनी व्यक्त केली.

 

मिळालेल्या माहिती नुसार बाणेर येथील गणराज चौका जवळ मुख्य रस्त्यावर, केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरु आहे, त्यांच्या बिल्डींगचा पाहाडाचे काम सुरु आहे, अत्यंत बेजबाबदार पणे काम सुरु आहे, त्यांच्या बिल्डिंग वरून लोखंडी सळईचा  गट्टू मुख्य रस्त्यावरती कु. रुद्र केतन राऊत (वय 9 वर्ष ) शाळेतून वीरभद्र नगर येथे घरी जाणाऱ्या बाळाच्या डोक्यात पडली, त्याचा रात्री 1:46 वा ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला.

छोट्याश्या बाळाचा बिल्डरच्या चुकीमुळे मृत्यु झाला अतीशय दुर्दैवी आणि संताप जनक घटना आहे. बिल्डिंगचे फ्रंट मार्जिंग चुकीचे दिसते, मुख्य रस्त्यालगत एवढी आवाढव्य बिल्डिंग एवढ्या कमी मार्जिंगला कशी बांधता येईल हा संशोधनाचा विषय आहे, सध्या हि बिल्डिंग म्हणजे बाणेरच्या मुख्य रस्त्यावर मृत्युंचा साफळा होईल कि काय अशी भीती आहे.

सदर साईट वरील मालक आणि संबंधित इंजिनियर्स यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे करत आहे.