March 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

अखेर बाणेर मधील हरिलीला सोसायटीची ड्रेनेज समस्येपासून होणार मुक्तता, लवकरच होणार काम सुरू…

बाणेर :

बाणेर मधील हरिलीला सोसायटी येथील ड्रेनेज लाईन जीर्ण झाल्याने नव्याने लाईन टाकण्याचे टेंडर ओपन झाले असून येत्या तीन चार दिवसात प्रत्यक्ष काम सुरूवात होणार आहे. या करिता आज प्रत्यक्ष औंध क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी पाहणी करत लवकर काम सुरू होऊन समस्या सोडविली जाईल असे सांगितले. अखेर अनेक महिन्यांपासून होत असलेल्या त्रासापासून हरिलीला सोसायटी ची मुक्तता होणार आहे.

हरिलीला सोसायटी येथील ड्रेनेज लाईन बाबत बालेवाडी फाटा गणपती मंदिरा समोर मुख्य रस्त्यात ड्रेनेज लाईन जीर्ण झाली आहे. गेली अनेक महिने येथे ड्रेनेज लाईन फुल्ल होते व ड्रेनेज रस्त्यावर वाहते, सोसायटी मध्ये साचते. रोज याठिकाणी सक्षणव्हॅन लाऊन लाईन साफ करावी लागते परंतू हा प्रश्न सुटत नाही अशी स्थिती होते कारण लाईन फार वर्षांपूर्वी टाकली होती आणि त्यावेळी लोकसंख्या मर्यादित होती परंतू आता याभागात रहिवासी मोठ्या प्रमाणात वाढले असून हि लाईन पुरेशी नव्हती व जीर्ण झाली होती.

आज वॉर्ड ऑफिसर श्री गिरीश दापकेकर साहेब यांच्या उपस्थिती मध्ये येथे व्हिजिट केली येथे 25 लक्ष रुपये प्रमाणे 2 टेंडर काढले असे एकूण 50 लक्ष रुपयाचे बजेट लावण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यांनी पाठपुरावा केला होता हे टेंडर ओपन झाले असून येथील काम सोमवारी किंवा मंगळवारी सुरु होणार आहे, सिमेंट रस्ता खोदून हे नवीन लाईन टाकावी लागणार आहे, हे काम डे- नाईट करावे अश्या सूचना मा मंत्री मोहदय आमदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या आहेत व हा रस्ता काही दिवसांसाठी एकेरी वाहतूक करावी लागणार आहे, व याठिकाणी वाहतूकीस अडथळा येणार आहे तरी नागरिकांनी हे अत्यंत महत्वाचे काम पूर्ण करण्यास सहकार्य करावे अशी विनंती माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर यांनी केली आहे.