बालेवाडी :
‘भोंदू बाबा’ खरात याच्या सोबतच्या फोटो वरून नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.
“उच्च तंत्र की उच्च तंत्र मंत्र! बोगस भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा?” असा उपरोधिक सवाल करत बालवडकर यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पाटील यांच्या साध्या व भोळ्या स्वभावाचा गैरफायदा संबंधित व्यक्तीने घेतला असण्याची शक्यता आहे. जर तसे झाले असेल, तर कोणत्याही दबावाला बळी न पडता त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करावी, असेही त्यांनी सुचवले.
बालवडकर पुढे म्हणाले की, कोल्हापूरचा पुरोगामी वारसा आणि पुण्याची समाजसुधारकांची परंपरा लक्षात घेता, उच्च शिक्षणासारखी गंभीर जबाबदारी असलेले मंत्री अशा भोंदू व्यक्तीसमोर का झुकले, हा प्रश्न कोथरूडमधील सुशिक्षित नागरिकांना पडला आहे.
तसेच, “या कथित मंत्रांच्या प्रभावामुळेच कोथरूडमधील नागरिकांच्या समस्या सुटल्या नाहीत का?” असा सवाल करत त्यांनी टीका अधिक तीव्र केली. “खरातसारख्या व्यक्तीसमोर मान तुकवणारा माणूस कोथरूडचा प्रतिनिधी कसा असू शकतो,” अशी चिंता स्थानिक नागरिकांमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी