औंध :
दरवर्षी साजरा होणारा औंध ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचा उत्सव यंदा मे महिन्यातील रविवार दि.०३ मे २०२६ रोजी होणार आहे. औंधगाव विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही तारीख घोषित करण्यात आली. सालाबादप्रमाणे ग्रामस्थांची ग्रामसभा भैरवनाथ मंदिरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी परंपरेप्रमाणे ॲड. अशोक पांडुरंग रानवडे पाटील, ॲड. सतिश रवींद्र रानवडे पाटील, सर्व आसमधनी, विश्वस्त, ग्रामस्थ यांच्या हस्ते नीलकंठेश्र्वर मंदिरात श्री गणेश पूजन, शिवपूजन करण्यात आले. परंपरागत पंचांग पूजन, वाचन करून औंधगाव विश्वस्त मंडळाचे अहवाल वाचनासह जमाखर्चाचा आढावा घेण्यात आला. गावच्या समस्या आणि ग्रामस्थांच्या त्यावरील सूचना, सर्वांचे मनोगत मांडण्यात आले. औंधगाव व्यायाम मंडळाकडून औंध ग्रामस्थांकरिता वैकुंठरथ देण्याचे जाहीर करण्यात आले.
औंधगाव विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने या वेळी पुण्यनगरीचे उपमहापौर श्री परशुराम वाडेकर व नवनिर्वाचित नगरसेविका सौ.भक्तीताई गायकवाड सौ. सपनाताई छाजेड व नगरसेवक श्री. सनीदादा निम्हण यांना विशेष सन्मानित करण्यात आले. तसेच ग्रामस्थांचे व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे देखील सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष राहुल प्र. गायकवाड, सचिव गिरीश जुनवणे, खजिनदार हेरंब कलापुरे, विश्वस्त योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, विकास गायकवाड, सागर गायकवाड, सुप्रिम चोंधे, विलास रानवडे, सुशिल लोणकर, सोपान राऊत व सल्लागार रणजित कलापुरे, सुनिल गायकवाड, सचिन रानवडे, आनंद जुनवणे,गणेश कलापुरे, राहुल दि. गायकवाड, ज्ञानेश्वर जुनवणे, ॲड. सुनिल गायकवाड, विशाल शिंदे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून रविवार ०३ मे २०२६ ही उत्सवाची तारीख घोषित केली.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!