November 22, 2024

Samrajya Ladha

बाणेरच्या श्रीकृष्ण संघानी किशोर गट पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढत खेळाडूंचा केला सन्मान…

बाणेर :

बाणेर येथिल श्रीकृष्ण कबड्डी संघाने कबड्डी इतिहासात पहिल्यांदाच किशोर गट पुणे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवून बाणेर गावच्या नावलौकिक मौल्यवान भर टाकली म्हणून बाणेर ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणुक काढून खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आणि माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि स्वप्नाली सायकर यांच्या हस्ते खेळाडूंचे औक्षण करून मिरवणुकीला मोठया उत्साहात सुरूवात झाली.

यावेळी खेळाडूंची पाठ थोपटत संघाचे प्रशिक्षक मंगेश मुरकुटे म्हणाले की, श्रीकृष्ण संघ अनेक वर्षापासून कबड्डी खेळत २४ जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सहभागी झाला आहे. आत्तापर्यंत बऱ्याचदा प्रयत्न करून देखील संघाला विजेतेपद पटकवता आले नव्हते. परंतु दरवर्षीपेक्षा अधिक जोमाने यावर्षी खेळाडूने अपार कष्ट घेत विजेतेपदाला गवसणी घातली. खेळाडूंनी घेतलेली अपार कष्ट, जिद्द या जोरावर तसेच कपिल पारखी यांची खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात मिळालेली साथ यामुळे हे विजेतेपद मिळाले असून संघाला नेहमीच प्रोत्साहित करणारे ग्रामस्थ राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि संघाचे आजी-माजी खेळाडू यांचा देखील या यशात तेवढाच हातभार आहे. खुल्या गटातील खेळाडूंनी देखिल चांगला खेळ करत उप उपांत्य फेरीपर्यंत प्रवेश केला होता. हे आनंददायी आणि उत्साह वाढविणारे असून पुढील वर्षी संघ सिल्वर जुबली २५ वा जिल्हा खेळणार आहे. येणाऱ्या काळात अधिक जोमाने संघ सराव करून यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करेल.

यावेळी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव डॉ. दिलीप मुरकुटे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा ओबीसी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रल्हाद सायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल बालवडकर, सामाजिक कार्यकर्त्या पूनम विधाते, मंदार पोरे, मंदार राराविकर आणि पंचक्रोशीतील कबड्डी खेळणारे संघ आवर्जून उपस्थित होते. बाणेर गावचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी बाहेर गावी असल्याने फोन वरून शुभेच्छा दिल्या, बाणेर गावातील राजकिय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच संघाचे आजी माजी खेळाडू पाठीराखे हितचिंतकानी मोठया उत्साहात उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.