November 22, 2024

Samrajya Ladha

औंध येथील नेहरू तरुण मंडळाच्या अमृतमोहोत्सव वर्षा निमित्त ‘अथर्वशीर्ष पठण १००१’ संकल्प पूर्ण..

औंध :

औंध येथील नेहरू तरुण मंडळाच्या अमृतमोहोत्सव वर्षा निमित्त महिलांसाठी ‘अथर्वशीर्ष पठण १००१’ चे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठया उत्साहात भक्ती भावाने औंध आणि आजूबाजूच्या परिसरातील ११०० ते १२०० महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले.

नेहरू तरुण मंडळ दरवेळी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. गेल्यावर्षी त्यांनी अथर्वशीर्ष पठण करतांना यावर्षी १००१ महिलांचा सहभाग घेऊन अथर्वशीर्ष पठण करण्याचा संकल्प केला होता. अपेक्षेपेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेत संकल्प पूर्ण केला.

अथर्वशीर्ष पठण स्री शक्तीचा जागर करत हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, भारतमातेच्या रक्षणासाठी संकल्प करून महिलांनी अथर्वशीर्ष पठण सुरू केले. २१ आवर्तने फलश्रुती झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त शिववंदना घेण्यात आली. त्यानंतर श्रींची महाआरती उपस्थित सर्व महिलांच्या आणि लहान मुलींच्या हस्ते करण्यात आली दोन हजार गणेशभक्त महिला भाविक भक्तांसाठी महाप्रसाद भोजन व्य्ववस्था करण्यात आली होती.