September 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध परिसरातील डुकरांचा प्रश्न मार्गी न लावल्यास शिवसैनिक नाना वाळके यांचा आंदोलनाचा इशारा..

औंधगाव :

औंधगाव, डी पी रोड, पल्लोड फार्म, विधाते वस्ती ओढ्याजवळी भागात फिरणाऱ्या डुकरांच्या वावरा मुळे परीसरात घाण, दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्यास हानि होत असून डुकरांचा वावर थांबावा म्हणून त्वरित कारवाई करावी अन्यता आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा नाना वाळके(सदस्य शिवसेना ठाकरे गट)यांनी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना निवेदन देत दिला. तसेच यावेळी औंध भागातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून देखील चर्चा करण्यात आली.

वारंवार तक्रारी करून देखील नागरीकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.औंधगाव, डी पी रोड, पल्लोड फार्म, विधाते वस्ती ओढ्याजवळी भागात फिरणाऱ्या डुक्करांच्या वावर मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सदर विषयी सात दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन करणार : नाना वाळके(शिवसैनिक ठाकरे गट)

सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आदेश देऊन संबंधित प्रश्न सोडवू अशी ग्वाही दिल्याची माहिती नाना वाळके यांनी दिली.

यावेळी सचिन नखाते (अध्यक्ष औंध प्रभाग शिवसेना ठाकरे गट), सुनिल हरिश्चद्रें, स्वप्निल नागरस उपस्थित होते.

 

You may have missed