June 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध भागातील नागरिकांसाठी सचिन मानवतकर यांच्या वतीने श्री. गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरत्या हौदाची व्यवस्था..

औंध :

औंध भागातील नागरिकांसाठी युवा नेते सचिन मानवतकर यांच्या वतीने श्री. गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरत्या हौदाची व्यवस्था केलेली आहे. यानिमित्ताने आज भाजपा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते विसर्जन हौदाचे उदघाटन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या जल्लोषात व आनंदात साजरा होत आहे. बघता बघता आज बाप्पांना येऊन ४ दिवस झाले. आता घरगुती श्री गणेश मूर्ती विसर्जनाची लगबग जवळ आली असून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांबरोबर प्रशासन देखील सज्ज आहे. परंतु प्रशासनावर विसंबून न राहता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून फिरता विसर्जन हौद नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहे : भाजपा युवा नेते सचिन मानवतकर

यावेळी रविंद्र साळेगावकर, गणेश बगाडे, सचिन मानवतकर, अजय दुधाणे, सचिन वाडेकर, सुरज गायकवाड, मनोज ठोसर, अक्षय घडसिंग, राम मंडलीक, प्रकाश सोलंकी आदी उपस्थित होते.

विसर्जन हौद साठी संपर्क नं – 9665355335