औंध :
दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांची जयंती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहा अंतर्गत भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या मार्फत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड तसेच आयुष्यमान भारत योजनेचे शिबीर आयोजित केले आहे. या योजनेतील काही लाभार्थ्यांना आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे कार्ड वाटप करण्यात आले.
शालीमार हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष निकेतन तिडके, अरिक राव, गंगा हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण विडे, शांतानिकेतन सोसायटीचे अध्यक्ष रविंद्र देशपांडे आदी मान्यवरांच्या हस्ते हे कार्ड वाटप करण्यात आले.
आयुष्यमान भारत योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ५ लाखांचा आरोग्यविमा मोफत दिला जातो. या योजनेचा लाभ आणखी काही लोकांना व्हावा यासाठी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांना महात्मा ज्योतीराव फुले योजने अंतर्गत सुद्धा लाभ मिळणार आहे. त्याच प्रमाणे केंद्र सरकारने रुग्णाच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण नोंदी ठेवण्याकरीता आभा कार्ड आणले आहे. या कार्डमुळे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येतो परिणामी त्याच्यावर उपचार करणे सोयीस्कर होते. शासकीय सुविधा मिळण्यासाठी सुद्धा या कार्डाचा उपयोग होतो. त्यामुळे औंध, औंध रोड, चिखलवाडी, बोपोडी येथील नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. मोदिजींच्या वाढदिवसानिमित्त आजपासून कार्डचे वाटप सुरु केले आहे. लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता शिबिराची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवली असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुनील माने यांनी केले आहे.
देशातील सर्व शेतकरी, तरुण आणि मजूर, महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुले यांच्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध योजना राबवल्या जातात. देशातील नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी मोदिजी यांनी आयुष्यमान भारत, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजना, डिजिटल इंडिया यासारख्या अनेक योजना आणल्या असल्याचे मत ही माने यांनी यावेळी व्यक्त केले.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…