June 2, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे शहरात जंगी स्वागत बाणेर, पाषाण परिसरातील कार्यकर्त्यांचा उत्साहात सहभाग..

पुणे :

छत्रपती शिवाजीनगर भागात असलेल्या छत्रपती शिवरायांचा जगातील पहिल्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तसेच पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून शिवाजीनगर ते कात्रज येथील नवले ब्रिज पर्यंत मा.अजितदादा पवार यांची भव्य दिव्य स्वागत रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष समिर चांदेरे व माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी कार्यकर्त्यांसह मोठया उत्साहात स्वागत रॅली मध्ये सहभाग घेतला.

पुणेकरांचे अजितदादांवर असलेले प्रेम प्रत्यक्ष अनुभवता आले. यावेळी युवा नेते पार्थदादा पवार, मंत्री धनंजय मुंडे साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

बाणेर पाषाण परिसरातून भव्य टू व्हीलर रॅली काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुष्पहार घालून व पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले.