August 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला महत्वाचा निर्णय, असा निर्णय घेणारे राज्यातील पहिले विद्यापीठ…

पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या बैठकीत महत्वाचा ठराव करण्यात आला आहे. मराठी भाषेचे महत्व वाढणार असुन मराठी ही ज्ञानभाषा, उद्योगाची आणि रोजगाराची भाषा होण्यासाठी विद्यापीठीय स्तरावर शिकवल्या जाणाऱ्या सर्व विद्याशाखेत मराठी हा विषय अनिवार्य करण्याचा ठराव करण्यात आला.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऐतिहासिक निर्णय घेत विद्यापीठ स्तरावर असा ठराव करणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ बनले आहे. अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास मंडळाची बैठक विद्यापीठात झाली.

गेल्या काही वर्षांत शैक्षणिक आणि सामाजिक जीवनात मातृभाषेकडे दुर्लक्ष केल जात आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकवण्यासाठी, मराठी भाषेची व्याप्ती वाढवण्यासाठी महाविद्यालयीन, विद्यापीठीय स्तरावरील प्रत्येक विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना मराठी शिकवली जावी. त्यामुळे ती ज्ञानभाषा होण्यासह व्यवसायाची, उद्योगाची भाषा होण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर सर्व विद्याशाखांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.

या बैठकीला अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे, सदस्य डॉ. सुधाकर शेलार, डॉ. प्रमोद आंबेकर, डॉ. शांताराम चौधरी, डॉ. पोर्णिमा घोडके, डॉ. सुरेश जाधव, राजीव बर्वे, डॉ. शीतल गोर्डे पाटील, डॉ. शोभा तितर, संजय ऐलवाड आदी उपस्थित होते.

 

You may have missed