औंध :-
औंधगाव येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. औंधगाव विश्वस्त मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. चंद्रकांत उर्फ बाळासाहेब टकले यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज मेघडंबरी येथे ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी श्री शिवाजी विद्या मंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत सादर करून ध्वजवंदना दिली.
कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यामध्ये श्री. दत्तात्रय बाबुराव गायकवाड (१२०० वेळा किल्ले सिंहगड गिर्यारोहण), ॲड. समीर वसंतराव गायकवाड (दक्षिण आफ्रिकेतील ९१ किमी कॉम्रेड मॅरेथॉन ११ तास ४३ मिनिटांत पूर्ण), आणि कु. आरोही मंगेश चोंधे (दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रौप्य व कांस्य पदक विजेती) यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी औंधगाव विश्वस्त मंडळ चे अध्यक्ष-राहुल प्र. गायकवाड, सचिव-गिरीश जुनवणे, खजिनदार -हेरंब कलापुरे, विश्वस्त – योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, विकास गायकवाड, सागर गायकवाड, सुप्रिम चोंधे, विलास रानवडे, ॲड.सुशिल लोणकर, सोपान राऊत, सल्लागार – रणजित कलापुरे, सुनिल गायकवाड, सचिन रानवडे, गणेश कलापुरे, राहुल दि. गायकवाड, आनंद जुनवणे, ज्ञानेश्वर जुनवणे, ॲड. सुनिल गायकवाड, विशाल शिंदे सर्व औंधगाव ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.


More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा