August 24, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त, पूजा किरण चांदेरे यांच्या हस्ते विविध सोसायट्यांमध्ये ध्वजारोहण…

बाणेर :

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, चाकणच्या माजी नगराध्यक्षा पूजा किरण चांदेरे यांनी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यामध्ये ग्रीनझोन, जाडिॅन सोसायटी, एलिना सोसायटी, लाइफ मॉंटेज, सुखवाणी हाईलँड आणि कोहिनूर एमराल्ड सोसायटी यांचा समावेश होता.

 

यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोसायट्यांनी आयोजित केलेल्या या ध्वजारोहण सोहळ्यांचे कौतुक करताना पूजा चांदेरे म्हणाल्या, “नागरिकांनी आयोजित केलेला हा ध्वजारोहण सोहळा खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारा होता. माझ्या परिसरातील नागरिकांनी मला आवर्जून आज हा ध्वजारोहणाचा मान दिला, त्याबद्दल मी आणि माझ्या चांदेरे कुटुंबातर्फे या सर्व सोसायट्यांमधील नागरिकांचे मनापासून आभार मानते.”

हा कार्यक्रम उत्साहाने आणि देशभक्तीच्या भावनेने भारलेला होता. यावेळी स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

You may have missed