September 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर आणि बालेवाडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अमोल बालवडकर ठरले कामाचा माणूस, ट्रॅफिक वॉर्डन्सची स्वखर्चातून नेमणूक…

बालेवाडी :

बाणेर आणि बालेवाडी परिसरात वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून अमोल बालवडकर फाउंडेशनने (Amol Balwadkar Foundation)  महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि बाणेर, बालवाडी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री डोंगरे यांच्याशी समन्वय साधून बाणेर, बालेवाडी परिसरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये २० ट्रॅफिक वॉर्डन्सची नेमणूक केली आहे. हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी राबवला जात असून, या माध्यमातून वाढत्या वाहतुकीला शिस्त लावण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे.

 

बाणेर बालवाडी परिसरातील राधा चौक, किया शोरूम चौक, गणेश मंदिर बालेवाडी फाटा, साई चौक बालेवाडी, जुपिटर चौक, ममता चौक बालेवाडी, कळमकर चौक, ऑर्चिड स्कूल, कलमाडी स्कूल, बीव्हीआरटीएस स्कूल अशा महत्वाच्या ठिकाणी जिथे वाहतूक कोंडी होते तिथे अमोल बालवडकर फाउंडेशन च्या वतीने ट्रॅफिक वॉर्डन्स उभे केले आहेत.

वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणि सुरक्षित प्रवासाची हमी
पुणे शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या बाणेर आणि बालेवाडी परिसरात निवासी संकुल, व्यावसायिक इमारती आणि शैक्षणिक संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी असते, ज्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. अशा परिस्थितीत, अमोल बालवडकर फाउंडेशनने नेमलेले हे ट्रॅफिक वॉर्डन्स पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या मदतीने, वाढत्या वाहतुकीस कारणीभूत ठरणाऱ्या अडचणींवर प्रभावी नियंत्रण मिळत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. या उपक्रमामुळे वाहतुकीचे नियमन अधिक प्रभावीपणे होत आहे आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर बनला आहे. समाजासाठी सकारात्मक कार्याचा हा पुढचा टप्पा असल्याचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी म्हटले आहे. या उपक्रमामुळे केवळ वाहतुकीची कोंडीच कमी होत नाही, तर वाहतूक नियमांविषयी जनजागृती होण्यासही मदत होत आहे.

अमोल बालवडकर यांच्या या विधायक कार्याचे परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अनेक नागरिकांनी या उपक्रमामुळे दररोजच्या प्रवासातील ताण कमी झाल्याचे सांगितले आहे. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणांसोबतच सामाजिक संस्थांनीही पुढे यावे, यासाठी हा उपक्रम पुणे शहरातील एक आदर्श उदाहरण ठरत आहे.

अमोल बालवडकर यांनी वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी उचललेले हे पाऊल, समाजाच्या सामूहिक हितासाठी काम करण्याच्या त्यांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.