पुणे :
ज्योतिर्गमय एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे आयोजित आर्यभट्ट स्पर्धा 2024-25 मध्ये चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूलने भव्य यश मिळवले आहे. शाळेने ३ शिष्यवृत्त्या, ९ पदकं तसेच उत्कृष्ट सहभागासाठी मानाचा चषक पटकावला आहे.
आज या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार नीतू मांडके हॉल, टिळक रोड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, डॉ. अ. ल. देशमुख लाभले. तसेच श्री किशोर बोरसे, सचिव – पुणे शहर मुख्याध्यापक संघ तसेच डॉ. रेणू पाटील, शिक्षण तज्ञ* यांनीही हजेरी लावली.
आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी अशा स्पर्धांची गरज व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे महत्त्व सांगितले.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना वर्षभर मार्गदर्शन व समन्वय करण्याचे कार्य शाळेच्या शिक्षिका सौ. कल्याणी शेलके यांनी यशस्वीरित्या पार पाडले. शाळेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व सौ. शिवानी बांदल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा कोलते यांनीही या अभिमानास्पद क्षणी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व संपूर्ण शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!