February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस शाखेतील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिवनपट दाखवून साजरी!!!

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि जूनियर कॉलेज च्या सूस शाखेत आज शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे प्रतिमापूजन करून त्यांच्यासह पर्यवेक्षक श्री .सचिन खोडके, स्मिता श्रीवास्तव, नेहा माळवदे यांनी दीप प्रज्वलन करून सर्व विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे मौन धरून लोकमान्य टिळकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली .

श्रद्धा पच्चीगर यांनी सूत्रसंचलन करून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची एक लहानपणीची गोष्ट सांगून मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफल उचलणार नाही या वाक्यामागचा इतिहास गोष्टीतून सांगितला. त्यानंतर सौ. अनुराधा यादव यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती दिली त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या नाटके लावण्या लोकनाट्य या विषयी माहिती सांगितली .इयत्ता सहावी मधील विद्यार्थी यश सूर्यवंशी हा लोकमान्य टिळक यांचा वेश परिधान करून “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच “अशी घोषणा केली.

विद्यार्थ्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित जीवनपट दाखवण्यात आला तसेच प्रफुलता झाडगावकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित एक गीत सादर केले.

या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन कायम पाठिंबा असणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर तसेच संचालिका सौ रेखा बांदल व शिवानी बांदल यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन व पेरिविंकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांचे अभ्यासपूर्ण नेतृत्वाखाली HOD सचिन खोडके, पर्यवेक्षिका नेहा माळवदे , स्मिता श्रीवास्तव तसेच सर्व विषयशिक्षक या सर्वांची जिद्द व चिकाटी यांचा मिलाप व सहकार्य आणि उच्च विद्या विभूषित आणि अनुभवी शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.

आजच्या जगात आजच्या पिढीला पुण्यनगरीचे जनक लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांची ओळख व त्यांच्याविषयी माहिती असावी व असे आदर्श डोळ्यापुढे ठेऊन शिकावे ही शिकवण हे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.