सुसगाव, पारखे गार्डन :
विद्या व्हॅली रोड येथील पारखे गार्डन परिसरात अखिल सुसगाव व्यापारी संघटनेचा भव्य मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात सुसगाव परिसरातील विविध व्यवसायिकांनी सहभाग घेतला आणि व्यापारी संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पार पडली.
या कार्यक्रमात श्री. ज्ञानेश्वर भानुदास चांदरे यांची अखिल सुसगाव व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. सचिनभाऊ निवगुणे आणि बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. अनिल विभुते सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधून, सुरक्षित व्यवसाय वातावरण, पोलिस प्रशासनाशी समन्वय आणि सायबर गुन्हेगारीपासून संरक्षण याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सुस गावातील चितळे स्वीट चे मालक मा श्री वैजनाथ देशमुख, सुसगाव व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरदतात्या भोते, भरत चौधरी,जयराम चौधरी, ह वि का सो नवनिर्वाचित चेअरमन गणपत तात्या चांदरे, डॉ गजानन राजपूत, निखिल ससार, महेश चांदेरे, विशालशेठ, पारखे पत्रकार प्रदीप पाटील सर, पत्रकार विनोद माझीरे, शिवजी राम चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले