August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेरच्या ओरिअन रेजेन्सी सोसायटीसमोरील पदपथाचे काम पूर्ण; नागरिकांनी समीर चांदेरे यांचे मानले आभार

बाणेर :

बाणेर हद्दीतील ओरिअन रेजेन्सी सोसायटीमध्ये पावसाचे पाणी शिरण्याच्या समस्येवर अखेर तोडगा काढण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी पुढाकार घेऊन सोसायटीसमोरील पदपथाचे काम पूर्ण केले आहे. यामुळे सोसायटीतील रहिवाशांचा एक महत्त्वाचा आणि जुना प्रश्न मार्गी लागला आहे.

 

गेल्या आठवड्यात समीर चांदेरे यांनी रहिवाशांसोबत एक बैठक घेऊन या समस्येवर चर्चा केली होती. त्यानंतर तात्काळ पदपथाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. हे काम आता पूर्ण झाले असून, यामुळे पावसाळ्यात सोसायटीमध्ये पाणी शिरण्याची समस्या दूर झाली आहे.

आपला प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ओरिअन रेजेन्सी सोसायटीमधील नागरिकांनी समीर चांदेरे यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी बोलताना समीर चांदेरे म्हणाले, “जनसेवेची ही संधी मला दिल्याबद्दल मी ओरिअन रेजेन्सी सोसायटीमधील नागरिकांचे मनापासून आभार मानतो. तसेच, महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानतो.”

 

You may have missed