बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे यांच्या वतीने या परिसरातील इयत्ता १० वी व १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००७ साली पुणे महानगरपालिकेमध्ये १० वी व १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यामध्ये इयत्ता १० वी मध्ये ८०% गुण मिळविणाऱ्यांना १५ हजार रुपये तर १२ वी मध्ये ८०% गुण मिळविणाऱ्यांना २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय एका कार्यक्रमांमध्ये अजित दादांनी घेतला तेव्हापासून आजपर्यंत ही योजना पुणे महानगरपालिकेमध्ये सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या परिसरातील इयत्ता १० वी व १२ वी मधील शिष्यवृत्ती मिळविणाऱ्यां विद्यार्थ्यांचा आणि उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा अजित दादांच्या शुभहस्ते हा सन्मान होत आहे.
रविवार दि. २० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलनातील बॅटमिंटन हॅाल येथे बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे या परिसरातील इयत्ता १० वी व १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते तसेच
मा. चंद्रकांत दादा पाटील ( उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य )
मा. दत्तामामा भरणे ( क्रिडा मंत्री, महाराष्ट्र राज्य )
मा. माधुरीताई मिसाळ ( राज्यमंत्री , महाराष्ट्र राज्य )
मा. अण्णा बनसोडे ( उपाध्यक्ष , विधानसभा )
मा. दिलीप वळसे पाटील ( आमदार , आंबेगाव विधानसभा म. संघ )
मा. शंकरराव मांडेकर ( आमदार, भोर , वेल्हा , मुळशी तालुका )
मा. चेतन तुपे ( आमदार , हडपसर विधानसभा म. संघ )
मा. हेमंत रासने ( आमदार , कसबा विधानसभा म. संघ )
मा. ज्ञानेश्वर कटके ( आमदार , हडपसर विधानसभा म. संघ )
मा. सुनील शेळके ( आमदार , मावळ विधानसभा म. संघ )
मा. सुनील कांबळे ( आमदार , पुणे कॉन्टेन्मेन्ट विधानसभा म. संघ )
मा. भिमराव तापकीर ( आमदार , खडकवासला विधानसभा म. संघ )
मा. सिद्धार्थ शिरोळे ( आमदार , शिवाजीनगर विधानसभा म. संघ )
मा. समीर चांदेरे ( अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी, पुणे शहर )
मा.राहुल दादा बालवडकर (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, पुणे शहर )
इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गुणगौरव समारंभ संपन्न होणार आहे.
अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे आयोजक बाबुराव चांदेरे यांनी दिली.


More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले